Contact: 02527272034
logo

Panchayat Samiti Shahapur | पंचायत समिती शहापूर अधिकृत संकेतस्थळ"> Styled Section

विभागाबद्दल माहिती

ठाणे जिल्हयातील शहापूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून शहापूर तालुक्याची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 313151 एवढी आहे. शहापूर तालुका हा डोंगरदऱ्या व खोऱ्यांनी नटलेला आहे. तालुक्याच्या पश्चिमेला माहुली किल्ला हे प्रेक्षणिय ठिकाण आहे. पूर्वेला सहयाद्री पर्वत असून या पर्वतराजाच्या कुशीत तालुक्याला भुषणावह ठरणारा अजापर्वत आहे. तेथे वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. या तालुक्यात तानसा, भातसा, वैतरणा ही जलाशये असून संपूर्ण मुंबईला या जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचा तालुका असल्याने येथिल लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती व मोलमजुरी करणे आहे. बहुसंख्य लोक, ठाकुर, कातकरी व कुणबी समाजाचे आहेत.

परिचय

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मधील नियम 56 नुसार प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असेल आणि या अधिनियमान्वये किंवा अन्यथा तिच्यामध्ये निहित केलेली असतील अशी सर्व कार्ये ही पंचायत समितीची कार्ये असतील.

व्हिजन आणि मिशन

  • मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सर्वसाधारण आदेशांना अधीन राहून पंचायत समितीच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन किंवा वर्ग चारच्या सेवेतील अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना अनुपस्थिती रजा मंजूर करेल.
  • कोणत्याही अधिकाऱ्याकडून किंवा कर्मचाऱ्याकडून कोणतीही माहिती विवरण, विवरणपत्र हिशेब, अहवाल किंवा स्पष्टीकरण मागविता येईल.
  • पंचायत समितीच्या बैठकीच्या कामकाजाशी संबंधीत असलेली सर्व कागदपत्रे व दस्तऐवज अभिरक्षेत ठेवणे.
  • पंचायत समितीच्या प्रदेय असणाऱ्या अनुदानाच्या किंवा अनुदानांच्या रक्कमांतून पैसे काढील व संवितरीत करील.
  • गटअनुदानातून हाती घ्यावयाच्या कामांच्या व विकास प्रयोजनेच्या संबंधात, राज्य शासनाकडून विर्निदिष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे मालमत्ता संपादन करण्यास किंवातिची विक्री किंवा हस्तांतरण करण्यास मंजूरी देण्याच्या अधिकारांचा वापर करील.

उद्दिष्टे आणि कार्ये

  • पंचायत समितीची बैठक बोलावून तिचे अध्यक्षपद भूषविणे.
  • गटविकास अधिकाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
  • समितीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करणे.
  • जिल्हा परिषद व शासन यांच्या आदेशानुसार काम पार पाडणे.
  • विकास योजनांवर नियंत्रण ठेवणे.
  • पंचायत समितीच्या सभा बोलावील त्या सभांचे अध्यक्षपद धारण करील व त्यांचे कामकाज चालवील.
  • पंचायत समितीचे अभिलेख पाहू शकेल.
  • अंमलबजावणीच्या किंवा पंचायत समितीचे ठराव आणि निर्णय कार्यान्वत करण्याचे काम धरून प्रशासनाच्या बाबतीत आणि पंचायत समितीचे हिशेब व अभिलेख यांच्या बाबतीत गटात काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या किंवा जिल्हा परिषदेखालील अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या करतीचे पर्यवेक्षण करील व त्यांवर नियंत्रण ठेवील.
  • गट अनुदानातून हाती घ्यावयाची कामे व विकास परियोजना यांच्या बाबतीत मालमत्ता संपादन करण्यास किंवा तिची विक्री अथवा तिचे हस्तांतरण करण्यास मंजूरी देण्यात संबंधात राज्य शासनाकडून विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अधिकारांचा वापर करील.
  • पंचायत समितीची मालमत्ता तपासण्याचा अधिकार.
  • पंचायत समिती वा जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या विकास प्रकल्पाची पाहणी करणे.
  • पंचायत समितीकडे कामावर असलेल्या कोणत्याही अधिका-याकडून किंवा कर्मचा-याकडून कोणतीही माहिती, विवरण, विवरणपत्र हिशेब किंवा अहवाल मागवता येईल.
  • गटातील जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही स्थावर मालमत्तेत किंवा गटातील जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या नियंत्रणाखालील व व्यवस्थापनाखालील कोणत्याही परिसंस्थेत किंवा जिल्हा परिषदेने अशा पंचायत समितीने अथवा तिच्या निर्देशानुसार हाती घेतलेले कोणतेही काम किंवा विकास परियोजना गटात चालू असेल त्या ठिकाणी प्रवेश करता येईल व त्यांचे निरीक्षण करता येईल.

शहापूर नकाशा

Shahapur Map by BookHolidays.in