Contact: 02527272034
logo

Panchayat Samiti Shahapur | पंचायत समिती शहापूर अधिकृत संकेतस्थळ"> Styled Section

पंचायत समिती शहापूर

बांधकाम विभाग

बांधकाम विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या अखत्यारातील रस्ते व इमारतीची बांधकामे व देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. त्याच बरोबर जिल्हा परिषदेअंतर्गत असणाऱ्या इतर विभागांकडून प्रशासकीय मान्यता घेऊन उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या निधीतून विभागाच्या इमारतीचे बांधकामे व अस्तित्वातील इमारतीचे दुरुस्ती इत्यादी कामे केली जातात.

जिल्हा परिषदेतील इमारती व बांधकाम बाबत नियंत्रण व तांत्रिक सल्ला व कामांची अंमलबजावणीचे काम कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग यांचे असते. कार्यकारी अभियंता हे बांधकाम विभागाचे प्रमुख असतात व त्यांचे अधिपत्याखाली प्रत्येक तालुक्यात एक उपविभागीय अभियंता असतो.

Construction Officer

श्री. वसंत श्रीपद वीर

उपविभागीय अभियंता (बांधकाम)

पंचायत समिती शहापूर

जिल्हा परिषदेच्या अखत्यारातील रस्ते व इमारतींची बांधकामे व देखभाल

जिल्हा मार्ग व ग्रामिण मार्ग दर्जाचे रस्ते बांधणे, देखभाल व दुरुस्ती

जिल्हा परिषदेच्या इमारतींचे बांधकाम व देखभाल कामे

इतर विभागांसाठी इमारती बांधकाम व दुरुस्ती कामे

स्मशानभूमी, अंगणवाडी बांधकामे व दुरुस्ती कामे

प्रशासकीय मान्यता अनुसार निधी वापरून बांधकाम कामे

तांत्रिक सल्ला व कामांची अंमलबजावणी

उपविभागीय स्तरावर कामांचे निरीक्षण व मार्गदर्शन

विविध योजनांच्या बांधकामाची प्राथमिक माहिती उपलब्ध करणे

अ.क्र. स्वरूप माहिती
1. विभागाबद्दल माहिती बांधकाम विभाग पंचायत समिती शहापूर

बांधकाम विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या अखत्यारातील रस्ते व इमारतीची बांधकामे व देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. त्याच बरोबर जिल्हा परिषदेअंतर्गत असणाऱ्या इतर विभागांकडून प्रशासकीय मान्यता घेऊन उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या निधीतून विभागाच्या इमारतीचे बांधकामे व अस्तित्वातील इमारतीचे दुरुस्ती इत्यादी कामे केली जातात.
1.1 परिचय जिल्हा परिषदेतील इमारती व बांधकाम बाबत नियंत्रण व तांत्रिक सल्ला व कामांची अंमलबजावणीचे काम कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग यांचे असते. कार्यकारी अभियंता हे बांधकाम विभागाचे प्रमुख असतात व त्यांचे अधिपत्याखाली प्रत्येक तालुक्यात एक उपविभागीय अभियंता असतो. त्यांची नेमणुक शासनाच्या बांधकाम विभागाकडून केली जाते. तालुका स्तरावरील उप विभागीय कार्यालय हे कनिष्ठतम कार्यालय आहे. जिल्हा परिषद बांधकाम मार्फत केल्या जाणा-या विविध योजनांच्या बांधकामाची सर्व प्राथमिक माहिती या स्तरावर उपलब्ध होऊ शकते.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागावर प्रशासकीय नियंत्रण ग्राम विकास विभागाचे असते.
1.2 व्हिजन आणि मिशन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अखत्यारातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या व शासनाकडून हस्तांतरीत झालेल्या इमारतींचे बांधकामे व अस्तित्वात असलेल्या इमारतींची देखभाल दुरुस्ती करणे. जिल्हा मार्ग व ग्रामिण मार्ग दर्जाचे रस्ते बांधणे, देखभाल व दुरुस्ती करणे.
1.3 उद्दिष्टे व कार्ये a. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अखत्यारातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या व शासनाकडून हस्तांतरीत झालेल्या इमारतींचे बांधकामे व अस्तित्वात असलेल्या इमारतींची देखभाल दुरुस्ती करणे.

b. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे इतर जिल्हा मार्ग व ग्रामिण मार्ग दर्जाचे रस्ते देखभाल व दुरुस्ती करीता असतात. या रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्ती करीता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत नियतव्यय प्राप्त होतो.

c. जिल्हा परिषदेच्या इतर विभागांकडून उदा. 1) पशुसंवर्धन विभाग 2) समाजकल्याण 3) ग्रामपंचायत विभाग 4) कृषि विभाग व 5) महिला व बाल कल्याण विभाग इ. विभागांकडे उपलब्ध होणाऱ्या निधीतून संबंधीत विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या नविन इमारती, स्मशानभूमी, अंगणवाडी बांधकामे व अस्तित्वात असलेल्या इमारतींची दुरुस्तींची कामे करणे व काम पूर्ण होताच संबंधीत विभागास हस्तांतरण करणे ही कामे प्राधान्याने केली जातात.
1.4 प्रशासकीय सेटअप 1) उपविभागीय अभियंता (प्रमुख)
2) शाखा अभियंता
3) कनिष्ठ अभियंता
4) वरिष्ठ सहायक
5) कनिष्ठ सहायक
6) तांत्रिक सहाय्यक
7) शिपाई
1.5 कोण आहे (संपर्क तपशील) श्री. वसंत श्रीपद वीर, उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग
मोबाईल नंबर: --