शहापूर पंचायत समिती अंतर्गत आरोग्य विभागाद्वारे तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविल्या जातात. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, लसीकरण मोहीम, आणि हिवताप तसेच इतर साथीच्या रोगांचे नियंत्रण हे प्रमुख कार्य आहेत. आरोग्य शिबिरे, जनजागृती कार्यक्रम व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सेवा राबवली जातात. ग्रामीण भागात वेळेत वैद्यकीय सेवा पोचवणे हा विभागाचा मुख्य उद्देश आहे.