श्री. बाबूराव जमुनाबाई हरी राठोड
गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी), पंचायत समिती शहापूर
अल्प परिचय;
श्री. बाबूराव जमुनाबाई हरी राठोड हे पंचायत समिती शहापूर येथे गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी) म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण विकास व पंचायती राज व्यवस्था मजबूत करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत.
शहापूर पंचायत समिती ही ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आहे. ही समिती ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, रोजगार हमी, जलसंधारण, कृषी, बांधकाम आणि इतर विभागांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. प्रशासनाच्या पारदर्शक व परिणामकारक अंमलबजावणीसाठी डिजिटल प्रणालींचा वापर वाढवून, नागरिक केंद्रित सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हे यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.
| समितीचे नाव | शहापूर पंचायत समिती |
|---|---|
| देश | भारत |
| राज्य | महाराष्ट्र |
| विभाग | कोकण |
| जिल्हा | ठाणे |
| क्षेत्रफळ | ७५०.५७ चौ. कि.मी. |
| गावांची संख्या | १७१ |
| ग्रामपंचायती | ११८ |
| लोकसंख्या | २,५८,६८० (२०११) ३,१०,००० (२०२४ अंदाजित) |
| समुद्रसपाटीपासून उंची | ९८ मीटर |
सरकारी उपयुक्त सेवा - भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या महत्वपूर्ण संकेतस्थळांवर दुवा