शहापूर पंचायत समिती अंतर्गत मनरेगा योजनेद्वारे ग्रामीण भागातील कामासाठी इच्छुक प्रत्येक कुटुंबातील प्रौढ सदस्यांना वर्षात १०० दिवस मजुरीची हमी दिली जाते. रोजगारासाठी जॉबकार्ड व मागणी आधारित नोंदणीची प्रक्रिया पार पाडली जाते. योजना अंतर्गत जलसंधारण, शेततळे, रस्ते, नरेप, बंधारे, सेंद्रिय खत टाकणे, शेती सुधारणा यांसारखी कामे प्राधान्याने केली जातात. मजुरांसाठी सुरक्षिततेची व मूलभूत सोयींची व्यवस्था केली जाते. पारदर्शक अंमलबजावणीसाठी ग्रामसभेचा सहभाग, सामाजिक लेखापरीक्षण व तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित आहे.