Contact: 02527272034
logo

Panchayat Samiti Shahapur | पंचायत समिती शहापूर अधिकृत संकेतस्थळ"> Styled Section

पंचायत समिती शहापूर

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी मुंबई ग्राम पंचायत अधिनियामाप्रमाणे संबंधित ग्राम पंचायतीची आहे. त्यामुळे ग्राम पंचायतींना तांत्रिक मार्गदर्शन तालुका व जिल्हा पातळीवर होण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची निर्मिती तालुका स्तरावर झाली आहे. सदर विभागांतर्गत तालुका स्तरावर देखभाल व दुरुस्ती कक्ष व यांत्रिकी उपविभाग आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम मागणी आधारित धोरण असून केंद्र शासन पुरस्कृत वर्धीत वेग कार्यक्रम, स्वजलधारा, राज्य शासन पुरस्कृत महाजल तसेच बिगर आदिवासी / आदिवासी अंतर्गत कामांचा समावेश करून 2009-2010 पासून सदर कार्यक्रमांचे रुपांतर "राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम" असे करण्यात आले

Water Supply Officer

श्रीम. विजया दत्तात्रय पांढरे

उपअभियंता (पाणीपुरवठा)

पंचायत समिती शहापूर

ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे.

नळ पाणी पुरवठा योजना व विंधन विहीर योजनांची आखणी व अंमलबजावणी.

दुरुस्ती व देखभाल कामांची प्रभावी अंमलबजावणी.

पाणी टंचाई निवारणासाठी तात्पुरत्या उपाय योजनांची अंमलबजावणी.

विद्युत व सौर पंप आधारित लघु नळ योजना राबविणे.

गुणवत्तापूर्ण व सुरक्षित जलपुरवठा हे प्राथमिक उद्दिष्ट.

स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबर समन्वय साधून कामकाज.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत कामकाज.

पाणी स्रोतांची गुणवत्ता तपासणी व शुद्ध पाणी वितरण.

अ.क्र. स्वरूप माहिती
1. विभागाबद्दल माहिती ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पंचायत समिती शहापूर

ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी मुंबई ग्राम पंचायत अधिनियमानुसार संबंधित ग्राम पंचायतीची आहे. त्यामुळे ग्राम पंचायतींना तांत्रिक मार्गदर्शन तालुका व जिल्हा पातळीवर होण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची निर्मिती तालुका स्तरावर झाली आहे. सदर विभागांतर्गत तालुका स्तरावर देखभाल व दुरुस्ती कक्ष व यांत्रिकी उपविभाग आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम मागणी आधारित धोरण असून केंद्र शासन पुरस्कृत वर्धित वेग कार्यक्रम, स्वजलधारा व राज्य शासन पुरस्कृत महाजल तसेच बिगर आदिवासी / आदिवासी अंतर्गत कामांचा समावेश करून सन 2009-2010 पासून सदर कार्यक्रमांचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम असे केले.
1.1 परिचय ग्रामीण भागाचा पिण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या मागणी आधारित धोरणांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजना व विंधन विहीरी या सारख्या उपाय योजना या विभागामार्फत राबविल्या जातात. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्णयान्वये मागणी आधारित लोकसहभागाचे लोकाभिमुख धोरण स्वीकारले व या धोरणानुसार योजनांची मागणी, आखणी, अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावयाची आहे. तसेच ज्या गावातील पाण्याचे उद्गम गुणवत्ता बाधित झालेले आहेत, अशा गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा या योजनेद्वारे करण्यात येतो.
व्हिजन आणि मिशन ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पुरेसे व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे
उद्दिष्टे व कार्ये मजकूर 1. नळ पाणी पुरवठा योजना करणे
2. साधी विहीर योजना
3. नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती करणे
4. साधी विहीर दुरुस्ती करणे
5. नवीन विंधन विहीर घेणे
6. विद्युत पंप/सौर पंपाद्वारे लघु नळ पाणी पुरवठा योजना करणे
7. विंधन विहीर दुरुस्ती करणे
8. टंचाई कार्यक्रम राबविणे
प्रशासकीय सेटअप 1) उपभियांता
2) शाखा अभियंता
3) कनिष्ठ अभियंता
4) वरिष्ठ सहायक
5) कनिष्ठ सहायक
6) वाहन चालक
7) पंप चालक
8) हातपंप मदतनीस
9) शिपाई
कोण आहे (संपर्क तपशील) 1) उपभियांता पाणी पुरवठा उपविभाग शहापूर – ९१६७०५४२२२
2) कनिष्ठ सहाय्यक – ९८५०३०११९६