भारतामध्ये सर्वप्रथम 1986 साली केंद्रीय पुरस्कृत ग्रामीण परिसी स्वच्छता कार्यक्रम (Central Sponsored Rural Sanitation Program) सुरु झाला. नंतर या कार्यक्रमाची सन २० ऑगस्ट २००३ या दिवशी संपुर्ण स्वच्छता अभियान (Total Sanitation Campaign) या नावाने केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री मा.श्रीम. सुयकांता पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
तदनंतर सन २००३-२०११ या कालावधीत जिल्ह्यात संपुर्ण स्वच्छता अभियान या नावाने राबविण्यात आले. त्यानंतर दिनांक १/४/२०१२ या तारखेपासून संपुर्ण स्वच्छता अभियानाचे नवे नामकरण निर्मल भारत अभियान (Nirmal Bharat Abhiyan) असे करण्यात आले.
त्यावेळेस ठाणे जिल्ह्याचा (ठाणे व पालघर) सर्वे करण्यात आला. त्यानंतर ०१ ऑगस्ट २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले होते. २ ऑक्टोबर २०१४ रोजी या अभियानाचे नामकरण देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) असे केले. अवर्ष या उपक्रमाचे अत्याधुनिकरण करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ म्हणून संबोधण्यात आले.
ठाणे जिल्हा मुंबई पासून जवळ आहे. ठाणे जिल्हाचा विचार करता हा जिल्हा औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर आहे व नागरीकरण झपाट्याने होत आहे तसेच आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याची ओळख आहे.
२०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार ठाणे जिल्ह्यात एकूण ९१२२५ कुटुंबांकडे शौचालय सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आणि त्यानुसार ३१ मार्च २०१७ रोजी सन २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार ठाणे जिल्ह्यातील ४२६ ग्रामपंचायतींना खुले शौचालयमुक्त घोषित करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एकूण ११० ग्रामपंचायती आहेत व मिसळून गावे २२२ आहेत.
ग्रामपंचायत स्तरावर वैयक्तिक शौचालय बांधकाम केले जाते. तसेच ओला व सुका कचरा व्यवस्थापनासाठी नाडेप व प्लास्टिक बाळी शेड आहेत. सांडपाणी व्यवस्थापनासाठी लीचपिट बांधण्यात आले आहेत.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबांकडे शौचालय सुविधा असणे आवश्यक आहे. त्यानुसार टप्पा २ अंतर्गत नवीन वाढीव कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी व वापरासाठी प्रवृत्त केले जाते.
तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ओला व सुका कचरा वेगळा करून त्याचे पुनर्वापरासाठी (Recycle) वापर करणे, नाडेप मध्ये कुटुंबाचा ओला कचरा टाकून खत तयार करणे व ते खत शेतीसाठी वापरणे, सांडपाणी साठी लीचपिट बांधकाम करून पाणी जमिनीत मुरवणे व त्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करणे या उद्दिष्टांसाठी काम केले जाते. त्यामुळे रोगराईस आळा बसतो.
कामाची अंमलबजावणी झाल्यानंतर अनुदान वितरीत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली होते. कामाची अंमलबजावणी गावस्तरावर ग्रामसेवकांच्या माध्यमातून केली जाते. यावर संयंत्रण गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे असते.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) व पाणी व स्वच्छता विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कामे केली जातात. तालुका स्तरावर समन्वयक गटविकास अधिकारी व कार्यक्रम अधिकारी तसेच BRC, CRC हे कामांची धुरा सांभाळतात.